Posts

::- तुझ्या आठवणीचा पाऊस पडतोय -::

इकडे तुझ्या आठवणींचा पाऊस पडतोय तुला आठवून इथे आभाळ ही गर्जतोय खूप आठवण येते तुझी क्षणो क्षणी तुझ्या आठवणीचा मनात पुर येतोय... अचानक आठवण येते तुझी जशी वीज कोसळते अन् पसरतो तुझ्या चेहऱ्याचा प्रकाश मनाच्या धर्तीवर नकळतच तुला पाहण्याची हुरहूर मनात दाटून येते मिठीत घेऊन भिजावं पावसात संगतीने तुझ्या, एक इच्छा जागी होते... Poem by- Vinod Jadhav  

::- प्रेमाबद्दल जास्त समजत नाही मला -::

मला प्रेमाबद्दल जास्त समजत नाही... पण माझ्यासाठी जे काय आहेस ते तूच आहेस... फक्त तूच आहेस... माझ्या आयुष्याची व्याख्या तूच आहेस... माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर आठवण तूच आहेस... तूच आहेस माझ्यासाठी जगण्यातला जिवंतपणा... तूच आहेस माझ्यासाठी माझ्या भविष्याची कल्पना.... स्वप्न असतात काय हे तुझे स्वप्न पाहता पाहताच शिकलो मी... कुणाच्या आठवणीत आकंठ बुडणे काय असतं हे तुझ्या आठवणीतूनच शिकलो मी.... तुझ्यापासूनच शिकलो मी पुन्हा एकदा आयुष्य जगायला... तुझ्यापासूनच शिकलो मी जगण्यासाठी लढायला.... तुला नाही माहित तू काय आहेस माझ्यासाठी... तुला नाही माहित श्वासाचं महत्त्व काय असतं जगण्यासाठी.... तू म्हणजे माझ्यासाठी श्वासच माझा.... तू म्हणजे रोज जगाला सामोरे जाण्यासाठीचा आत्मविश्वास माझा.... Poem by- Vinod Jadhav 

::- तुझ्याविना काहीच नाही मी -::

तुझेच फोटो पाहत राहतो मी 24 तास पण फोटो पाहणं हेच प्रेम दाखवण आहे का ? तुलाच आठवतो मी २४ तास पण आठवण करत रहाणं हेच प्रेम आहे का ? तुझ्या भेटीसाठी असतो आतुर मी 24 तास पण भेटणं हेच प्रेम असतं का ? कुठेही असो मी असतो माझ्या मनावर तुझाच ताबा 24 तास पण कोणाला मनात बसवन हेच प्रेम असतं का ? जवळ राहावं वाटतं तुझ्या मिठीत घ्यावं वाटतं तुला दिसताच क्षणी नजरेत काबीज करून ठेवाव वाटतं तुला दुसरं काही सुचतच नाही फक्त पहातच राहावं वाटतं तुला तुझ्याविना जगणं हे जगणंच नाही फक्त तूच पाहिजेस मला... तुझ्या एका आवाजासाठी थांबलोय मी तुला माझी बनवण्यासाठी तरसलोय मी फक्त तुझ्या संगे जीवन घालवण्याचे स्वप्न पाहतो मी तू आहेस तर मी आहे तुझ्याविना काहीच नाही मी... माझ्यासाठी प्रेम म्हणजे तूच आहेस माझ्यासाठी आयुष्य म्हणजे तूच आहेस तूच आहेस माझ्यासाठी आनंदाची परकाष्ठा तूच आहेस माझ्यासाठी माझी परिभाषा... Poem by- Vinod Jadhav   

::- मला कधीच बाय म्हणू नकोस -::

मला कधीच बाय म्हणू नकोस... असच राहू देत जा अधुर बोलणं आपलं असच चालू राहू देत गप्पा आपल्या निरंतर कधी ना संपणाऱ्या... मध्येच व्यस्त हो कामात आपल्या मी वाट पाहीन मध्येच जग सुखाने आयुष्य आपलं मी वाट पाहीन खूप हास खूप आनंद उधळ जगात तू मी वाट पाहीन नवनवीन आनंद घे या जीवनाचे तू मी वाट पाहीन जगता जगता कधी हसता हसता येईल तुला आठवण माझी मी वाट पाहीन... परत रंगवू गप्पा आपल्या जस कधी आपण थांबलोच नाही परत हरवून जाईन मी शब्दांत तुझ्या जसा क्षणाचाही दुरावा कधी आलाच नाही... तुझी वाट पाहण्यात आहे एक वेगळीच नशा तुझ्या विचारांत हरविनात्यातच मिळते मला जगण्याची मजा तुझ्या स्वप्नांतच दिसते मला आयुष्याची दिशा... पण, तू कधीच मला बाय म्हणू नकोस Poem by- Vinod Jadhav  

::- कुठे गायब झालीस तू? -::

एक Hiyy म्हणून कुठे गायब झालीस तू एक आस लावून मनाला कुठे लपलीस तू ह्रदयाचे ठोके वाढवून का शांत झालीस तु क्षणात माझी अन् पुढच्याच क्षणात कुठे हरवलीस तू... तुझ्याच विचारांत असतो हरवलेला मी तुझाच भेटीसाठी आसुसलेला मी तुझाच जन्मोजन्मीचा एक पागल प्रेमी मी तू आहेस लैला माझी अन् तुझाच वेडा मजनू मी... लाखो प्रश्न पडतात मला एक साथ काही चुकलं तर नव्हत ना माझं जेव्हा झाली तुझ्याशी शेवटी बात नकळतच व्याकूळ होऊन जात मन माझं पाहण्यासाठी एकदा चेहरा तुझा, एकदा ऐकण्यासाठी तुझा आवाज... ऐक ना... तुझा आवाज ऐकल्याविना आता चैन पडणार नाही तुला मिठीत घेटल्याविना श्वासात श्वास येणार नाही लवकर ये अलगद आयुष्यात माझ्या अन् बनुन जा माझी राणी तुझ्याशी दुरावा आता सहन होणार नाही... Poem by- Vinod Jadhav  

::- तू मला विसरली तर नाहीस ना ? -::

तू मला विसरली तर नाहीस ना ? दिवसातून एकदा तरी तुला माझी आठवण येते ना ? कधी मला आठवून हसतेस का तुही ? कधी मला पाहण्यासाठी झुरतेस का तुही ? आठवतो का मी तुला जेव्हा तुला उचकी येते आठवतो का मी तुला जेव्हा स्वतःला तु आरशात पाहते आठवतो का मी तुला जेव्हा काहीतरी अधूरस वाटते आठवतो का मी तुला जेव्हा मन बेचैन होते... अचानक ये माझ्याकडे मी तुझाच आहे सरळ येऊन बनून जा माझीच सात जन्मासाठी मी तुझाच आहे स्वतःहून ही जास्त प्रेम झालय तुझ्यावर हे आयुष्य आता तुझाच आहे... पण, तू मला विसरली तर नाहीस ना? Poem by - Vinod Jadhav  

::- प्रेमाचा जादू -::

उत्साह माझ्या मनातला कधी मावळतच नाही वाढतच जातेय रोज चमक माझ्या चेहऱ्यावरची तुझ्या प्रेमाचा जादू चढलाय माझ्यावर असा काही चालतो मी जमिनीवर मात्र पाय काही जमिनीला टेकत नाही... ना उरला आता मोह कशाचा तुझ्या भेटी शिवाय ना उरली इच्छा मिळवण्याच्यी काही तुझ्या प्रेमा शिवाय तूच, फक्त तूच हवी आहेस मला तुझाच, फक्त तुझाच नाव आता आठवत मला तुझाच, फक्त तुझाच चेहरा आता आवडतो मला तुझेच, फक्त तुझेच स्वप्न आता येतात मला... कसली ही जादू सखे केलीस तू माझ्यावर प्रेमाचा बेधुंद नशा आता चढलाय माझ्या मनावर मागण एवढच आता मी मागतो देवापुढे एकही क्षण तुझ्या प्रेमाशिवाय आता जाऊ नये असच निघून जावं आयुष्य तुझ्यावर प्रेम करता करता नशा तुझ्या प्रेमाचा कधीच उतरू नये... Poem by - Vinod Jadhav

::- सखे तुझी आठवण येत नाही -::

तू कधी विसरतच नाहीस  नजरेसमोरून कधी दूर जातच नाहीस  कितीही दुरावा असला जरी आज  तू कधी माझ्याहून दूर जाणवत नाहीस... तुझ्या फोटोशी सतत गप्पा चालूच असतात  मध्येच कधी तुझे जुने मेसेज बोलायला लागतात  तसा तर जगासाठी राहतो एकटा घरात मी  तू आहेस अविरत सोबत माझ्या हे सत्य मानतो मी... आयुष्यभर माझ्या मनात तू अशीच रहावी  जीवनात माझ्या तुझ्या प्रेमाची सावली असावी  एका क्षणासाठी तरी तू फक्त माझीच असावी देवाने फक्त माझी ही एकच इच्छा पूर्ण करावी Poem for- YOU (जानू)  Poem By - Vinod

::- बनशिल का माझी राणी तू -::

सखे आज झोप काही येत नाहीये  तुझ्याशी गप्पा मारण्याची खूप इच्छा होतेय काही क्षणांसाठीच पाहिलं मी आज तुला  तुझा चेहरा काही नजरेसमोरून जात नाहीये... वाटलं एकदा मेसेज करून पहावं तुला  मला आठवत असशील कदाचित तूही असं वाटलं मला पण पुढच्याच क्षणी आठवलं तो अधिकार अजून मला मिळाला नाहीये  24 तास असशील फक्त माझीच तू योग अजून तो आला नाहीये... असाच पाहत बसलो फोटो तुझे  त्यातले काही फोटो आहेत फक्त माझे  खूप वाटतं कायमची माझीच बनुन राहावी तू  तुझ्या संगतीने असेन मी राजा जगाचा जेव्हा असशील माझी राणी तू...

::- सखे तुझे फोटो -::

::- सखे तुझे फोटो -:: साडी असो की इंग्लिश ड्रेस जानू तुझी एक झलक ही करते मला इम्प्रेस छोटीशी बिंदी ती कपाळावरची तुझ्या क्षणात वाढवते माझा हार्ट रेट... काळी साडी ती तुझी अन् ते मोकळे केस त्यावर घातलेला तो नक्षीदार मॅचिंग ब्लाऊज खूपच नितळ ग प्रिये सौंदर्य तुझं कितीदा ही पाहिलं तरी पुरी होतच नाही माझी हौस... सौंदर्य अजून खुलवणार तुझं ते पिवळ इंग्लिश ड्रेस खरं सांगतो सिनेमातून आलेली तू हीरोइन दिसतेस कितीदा पाहिलं फोटो तुझा मी रोखून श्वास इंग्लिश ड्रेस मध्ये जानू तू दिसतेस खूपच खास... आहेत माझ्याकडे डार्लिंग तुझे काही फोटो प्रायव्हेट रोमांचित होऊनी पाहतो मी जेव्हा जेव्हा झोप नाही येत भान हरवून वाटतं माझीच सखी तू जन्मोजन्मीची कधी येईल तो दिवस जेव्हा तुला घेता येईल मिठीत थेट... सर्वच रूप मनमोहक तुझी तू सौंदर्याची खान रोखल किती मनाला पण नकळतच तू बनलिस माझी जान Poem by - Vinod Jadhav  

::- मना सांग मला -::

मना सांग मला, हुरहुर का लागते जीवाला तिच्या भेटीची ओढ का लागते मनाला का तिच्याशीच बोलत रहावसं वाटतं का तिचाच चेहरा नजरेत भरलेलं असत का वाटतं तिची एक झलक तरी रोज दिसावी का वाटतं ती आयुष्यभर सोबत असावी का तिच्या विचारात मन गुंतून असतं का ती आठवताच ओठांवर हसू येत का वाटतं तिला मागच्या जन्मी पासूनच जाणतो मी का वाटतं माझ्या आयुष्यात होती फक्त तिचीच कमी का वाटतं तिच सौंदर्य जगा समोर यावं का वाटतं तिने फुलपाखरासारख स्वच्छंद जगाव का वाटतं जीवनात तिच्या दुःखाचं लवलेश नसावं का वाटत लेकरांसारख तिने हासतच राहावं का कधी वाटतं तिने जादू तर केली नाही माझ्यावर का वाटतं जीवापाड प्रेम कराव तिच्यावर का माझी नसूनही ती माझीच वाटते का ती कधी सोडून जाईल याची भीती वाटते का वाटतं बहाण्याने चिडवाव तिला का वाटतं आपल्या शब्दाने थोड हसवाव तिला का वाटतं तिच्याशी बोलताना कसलाच व्यत्यय नसावं का वाटतं आपल पूर्ण वेळ फक्त तिलाच द्याव का वाटतं दुनियेशी लपून तिच्याशी भेटावं का वाटतं तिला मिठीत घ्यावं आणि वेळ तिथेच थांबावं Poem by - Vinod Jadhav  

::- जा जानू ब्रेकअप -::

जा जानू ब्रेकअप, तुझं प्रेमच नाही माझ्यावर पण, खरं सांगतो, मी नाही प्रेम केलं फक्त तुझ्या शरीरावर मनातून तुला माझीच मानतो मी वेड्यासारखा तुझ्यावर एकतर्फा प्रेम करतो मी ... शब्दात नाही सांगू शकणार तू काय आहेस माझ्यासाठी तरी सांगतो देवाने पूर्ण केलेली एक मागणी आहेस तू माझ्यासाठी असाच नाही तुला भेटण्यासाठी तडफडत मी असाच नाही रात्रंदिवस तुझे फोटो पाहत मी कदाचित कधीही माझी होणार नाहीस तू हे जाणूनही जीवापाड तुझ्यावर प्रेम करतो मी... का जागाव तुझ्या विचारात रात्रभर का आठवतो तुझ्या भेटीच्या क्षणांना प्रत्येक श्वासासोबत का असतो तुझा फोटो सदैव माझ्या डोळ्यासमोर हजर का लागलेली असते तुझ्या मेसेज कडेच माझी नजर समजणार नाही तुला पण त्याची मला खंत नाही तुझ्या प्रेमात पडलो यापेक्षा मोठं सुख मला आठवत नाही ... कधीतरी अचानक अलगद पोचवेल माझ्या हृदयाची आवाज देव तुला कधीतरी एकदा मला पाहण्यासाठी होईल बेचैन जीव तुझा कधीतरी तुही रात्र घालवशील आठवणीत माझ्या खरं प्रेम झालय ग जानू तुझ्यावर कुठवर राहशील तू माझ्या विना... असच वाटतं एक दिवस माझा पत्ता शोधत येशील तू एक दिवस माझा आवाज ऐकल्याशिवाय होशील बेचैन तू असंच वा...

::- रस्त्यातून दिसणार आयुष्य -::

कधी आपल्याच घराकडे दुरून पाहत थांबतो दुरून कसं दिसतं असेल माझं घर अंदाज बांधतो काय वाटतं असेल रस्त्यातून जानाऱ्याला किती लोक इच्छुक असतील बर माझी जागा घ्यायला? रस्त्यातून दिसेल एक सरकारी घर ज्याला सिमेंट च कुंपण अन् पसरलाय सात गुंठ्यावर कुंपणाच्या आत शेडच्या खाली थांबलेली एक पांढरी शुभ्र कार मनात येत असेल लोकांच्या किती असेल बर साहेबांचा पगार... घराबाहेर एक छोटंसं स्वतःच गार्डन कधी मी झाडांना पाणी घालताना दिसत असणार साहजिकच मनात येत असेल मी असतो तर इथे तरकारी उगविली असती यार... मी तसा नेहमी दाराच्या आतच कोंडलेला असतो बाहेरून कुठे कोणाला माझा एकलेपणा दिसतो कधी असच तासभर अंधार करून घडीची टिकटिक ऐकतो तर कधी बेचैन होऊन घरातच फिरत राहतो... सगळं असूनही कधी एखाद्या भिखाऱ्यासरख वाटत जेव्हा दिवस फक्त दाल भात खाऊन निघत चालूच असतात सारखी फोनवर कॉल्स नी मेसेज मनातल बोलायला मात्र सोबत कुणीच नसत ... कधी रमत मन कुणाच्या स्वप्नामध्ये कधी मन कोणा आपल्यासाठी झुरत सुखाच्या वस्तूंनी पिंजून ठेवलेलं हे घर कधी कधी भयाण शांत होऊन जात... प्रेम करणारा कुणी नाही ज्याच्यावर प्रेम करावं असाही कुणी सोबत नाही काळजी ...

::- रात्रीची भेट ती दोन मिनिटाची -::

रात्रीच्या दोन वाजता बिना मेकअपची भेटली मला ती पाहून ते नितळ सौंदर्य तीच पुन्हा पडलो प्रेमात मी... एवढं सुंदर कुणी कसं असू शकतं प्रश्न पडलाय मला आता तुला पुन्हा भेटण्यासाठी जीव माझा उतावळा झाला... खरंच प्रिये खूप मस्त आहेस ग तू तुझ्या स्पर्शात आहे एक वेगळीच जादू... दोन मिनिटांचीच भेट आपली अनोख सुख देऊन गेली तुला भेटून मनात आलं तू आधी का नाही मला भेटली... ओढ जीवाला लागली आता दुसऱ्या भेटीची पहिली परीक्षा सखे आपण पार केली आपुल्या प्रीतीची... आता दोन मिनिटात मन भरेल असं वाटत नाही तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यावाचून थांबन आता शक्य नाही... लवकरच होईल पुढची भेट आपली भेट ती ठरेल अविस्मरणीय माझ्या आयुष्यातली... पुढच्या भेटीत रात्रभर तुला मिठीत घेईन कधी स्वप्नातही विचार न केलेलं तुला सुख देईन... राणी भीती तू सोडून दे, खुलून प्रेमात मला साथ दे एका रात्रीतच प्रेमाचा आपल्या आस्वाद घे... आता तुझ्याहून दूर राहणं मला जमणार नाही पुढच्या भेटीत कुठलीही शर्त तुझी टिकणार नाही.... खूपच मस्त आहे ग तू राणी तुझ्याहून दूर आता कसं राहू ये लवकर मिठीत माझ्या चल प्रेमात दोघे वाहून जाऊ... Poem for- YOU ( जानु ) 

::- मना सांग मला -::

मना सांग मला, हुरहुर का लागते जीवाला तिच्या भेटीची ओढ का लागते मनाला का तिच्याशीच बोलत रहावसं वाटतं का तिचा चेहरा सतत नजरेत भरलेलं असत का वाटतं तिची एक झलक तरी रोज दिसावी का वाटतं ती आयुष्यभर सोबत असावी का तिच्या विचारात मन गुंतून असतं का ती आठवताच ओठांवर हसू येत का वाटतं तिने जादू तर केली नाही माझ्यावर का वाटतं जीवापाड प्रेम कराव तिच्यावर का माझी नसूनही ती माझीच वाटते का ती कधी सोडून का याची भीती वाटते का वाटतं बहाण्याने चिडवाव तिला का वाटतं आपल्या शब्दाने थोड हसवाव तिला का वाटतं तिच्याशी बोलताना कसलाच व्यत्यय नसावं का वाटतं आपल पूर्ण वेळ फक्त तिलाच द्याव का वाटतं दुनियेशी लपून तिच्याशी भेटावं का वाटतं तिला मिठीत घ्यावं आणि वेळ तिथेच थांबावं... Poem by - Vinod Jadhav 

::- लबाड आहेस डार्लिंग तू -::

भारी लबाड आहेस डार्लिंग तु रात्री माझ्या भावनांशी खूप खेळलीस तू तुझ्या भेटीसाठी आतुर रात्र जागुन काढली मी 'कुठल्याही क्षणी येईल मेसेज तुझा' वाट पाहिली मी... काल दुपारी 'माझं पिल्लू, माझ्या राजा रात्री बारा एक वाजता भेटते मी'- म्हटली होतीस तू तुझ्या त्या शब्दांनी घायाळ होऊनी रात्रभर वाट पाहत राहिलो मी बनूनी भूत... खूप राग आला होता तुझा 'आता बोलणार नाही तुझ्याशी' ठरविलं मी मनाशी पण मनातून तुझा विचार काही जात नाही जसा काही मी तुझ्या प्रेमाचाच उपाशी... प्रेमाचा हा खेळ असाच चालेल कधी होईल भेट कधी तुझी वाट बघून रात्र जागून काढेल पण माझं प्रेम हे काही खेळ नाही माझ्या मनातून तुला काढण्यासाठी देवाला खाली यावं लागेल... Poem by- Vinod Jadhav  

::- तुझी आठवण मी करत नाही -::

एका क्षणासाठीही तुझी आठवण मी केली नाही एका क्षणासाठीही तुला मी विसरूच शकलो नाही सतत बोलत असते तू माझ्याशी मनातल्या मनात सतत गुंजत राहतो सखे तुझा आवाज माझ्या कानात. याला प्रेमाचं नाव देण्याची घाई तू करू नको मला तुझा गरजू असेही सखे तु मानू नको खरं सांगू प्रिये तू व्यसन बनलीस माझी तुझा नशा वाढतच जातोय, इतक्यात नशा उतरणार नाही. जाणतो मी, चांदणी कितीही आवडली तरी तिला हात लावता येत नाही हवेची मंद झुळूक कधी आपलीच बनवून ठेवता येत नाही माझ्यासाठी चांदण्यांसारखीच आहेस प्रिये तु चांदण्याहूनही सुंदर, कितीही पाहिलं तुला  तरी तू माझीच म्हणून मिरवता नाही. Poem by- Vinod Jadhav  

::- नवीन आयुष्य -::

एक काळ होता एकट राहायला भीत होतो मी आता तिच्या धुंदीत एकटेपणा हवाहवासा वाटतो मला एक काळ होता गाणी ऐकता ऐकता झोपायचो मी आता तिचा आवाज सारखा मनात ऐकू येतो मला एक काळ होता प्रेमाच्या नावाने भिऊ लागलो होतो मी आता तिच्या प्रेमात पार बुडून गेलोय मी एक काळ होता जुन्या आठवणी भेडसावत होत्या मला आता तिच्यासोबत सुंदर वर्तमान दिसतोय मला एक काळ होता स्वतःला आरशात पाहायचं सोडलं होतं मी आता तिच्यासाठी व्यवस्थित रहावस वाटतं मला एक काळ होता एकेक दिवस वर्षासारखा भासायचा आता तिच्याशी बोलता बोलता कळत नाही दिवस कधी संपला एक काळ होता नशेत धुंद रहावस वाटायचं मला आता तिच्या प्रीतीचा नशा चढलाय मला एक काळ होता हसण विसरून गेलो होतो मी आता तिला आठवत मनातच हासत राहतो मी एक काळ होता परत कोणावर जीव लावीन असं वाटलं नव्हतं आता तिच्यावर जीव ओवाळून टाकावस वाटत मला एक काळ होता आयुष्य नकोस झालं होत मला आता आयुष्य माझं सुंदर करण्यासाठी देवाने पाठवलय तुला... THANK YOU GANPATI BAPPA.... Poem by- Vinod Jadhav For - YOU ( जानू ) 

::- हुरहूर -::

खूप तडफतोय मी तुझा आवाज ऐकायला खूप आवडतं मला तुझ्याशी बोलायला... रात्री झोप काही केल्या नाही,  कट्टी झालीय माझी झोपशी वाट बघत असतो मी तुझ्या कॉल नाहीतर मेसेजची... डोळे बंद केले की सारखी तूच असते समोर झोपाव म्हटलं तर मनात सुरू होते हुरहूर... खूप पारेशान झालोय ग राणी तुझ्या नादात काहीतरी जादू आहे तुझ्या आवाजात... पहील्या सारखं मोबाईल पाहत बसू वाटत नाही आता तुझा फोटो हजारदा पाहिल्याशिवाय चैनच पडत नाही... कधी येईल तुझा मेसेज मी वाट पाहत बसतो फोन सायलेंट तर नाही ना? मी शंभरदा तपासतो... काय काय बोलायच तुझ्याशी सारखा हाच विचार चालू असतो फोन वाजताच मी ताडकन उठून बसतो... पण तू काही फोन करतं नाहीस सांग मी काय करू, काय हालत माझी केलीस तु सारखा देवाला कोसत बसतो मी, आधी का नाही भेटलीस तू... Poem by- Vinod Jadhav  

::- तुझ्याशी बोलत राहीन -::

तुझ्याशी तोवर बोलत राहीन जोवर तू म्हणणार नाहीस ' तू परेशान करतोय मला '... तुझ्याशी तोवर प्रेम करीन जोवर तू म्हणणार नाहीस ' एवढं प्रेम नको मला '.... तुझी एवढी काळजी घेईन जोवर तू म्हणणार नाहीस ' जा तुझी गरज नाही मला '... तुझी एवढी आठवण करत राहील जोवर तू म्हणणार नाहीस ' नको करुस आठवण माझी, दिवसभर उचकी येते मला '... प्रेमात पडलोय ग राणी मी तुझ्या प्रेमात एवढं बुडविन तुला की म्हणशील ' सात जन्मासाठी तूच प्रियकर पाहिजे मला '.... Poem by- Vinod Jadhav