::- सखे तुझी आठवण येत नाही -::

तू कधी विसरतच नाहीस 
नजरेसमोरून कधी दूर जातच नाहीस 
कितीही दुरावा असला जरी आज 
तू कधी माझ्याहून दूर जाणवत नाहीस...
तुझ्या फोटोशी सतत गप्पा चालूच असतात 
मध्येच कधी तुझे जुने मेसेज बोलायला लागतात 
तसा तर जगासाठी राहतो एकटा घरात मी 
तू आहेस अविरत सोबत माझ्या हे सत्य मानतो मी...
आयुष्यभर माझ्या मनात तू अशीच रहावी 
जीवनात माझ्या तुझ्या प्रेमाची सावली असावी 
एका क्षणासाठी तरी तू फक्त माझीच असावी
देवाने फक्त माझी ही एकच इच्छा पूर्ण करावी

Poem for- YOU (जानू) 
Poem By - Vinod

Comments

Popular posts from this blog

:: - Of the Skin - ::

TUJHI AATHVAN KHUP YETE

KAS SANGU TULA