::- मना सांग मला -::

मना सांग मला, हुरहुर का लागते जीवाला
तिच्या भेटीची ओढ का लागते मनाला
का तिच्याशीच बोलत रहावसं वाटतं
का तिचाच चेहरा नजरेत भरलेलं असत
का वाटतं तिची एक झलक तरी रोज दिसावी
का वाटतं ती आयुष्यभर सोबत असावी
का तिच्या विचारात मन गुंतून असतं
का ती आठवताच ओठांवर हसू येत
का वाटतं तिला मागच्या जन्मी पासूनच जाणतो मी
का वाटतं माझ्या आयुष्यात होती फक्त तिचीच कमी
का वाटतं तिच सौंदर्य जगा समोर यावं
का वाटतं तिने फुलपाखरासारख स्वच्छंद जगाव
का वाटतं जीवनात तिच्या दुःखाचं लवलेश नसावं
का वाटत लेकरांसारख तिने हासतच राहावं
का कधी वाटतं तिने जादू तर केली नाही माझ्यावर
का वाटतं जीवापाड प्रेम कराव तिच्यावर
का माझी नसूनही ती माझीच वाटते
का ती कधी सोडून जाईल याची भीती वाटते
का वाटतं बहाण्याने चिडवाव तिला
का वाटतं आपल्या शब्दाने थोड हसवाव तिला
का वाटतं तिच्याशी बोलताना कसलाच व्यत्यय नसावं
का वाटतं आपल पूर्ण वेळ फक्त तिलाच द्याव
का वाटतं दुनियेशी लपून तिच्याशी भेटावं
का वाटतं तिला मिठीत घ्यावं आणि वेळ तिथेच थांबावं


Poem by - Vinod Jadhav  

Comments

Popular posts from this blog

KAS SANGU TULA

FAKT TUZYA SATHI

TUJHI AATHVAN KHUP YETE