::- बनशिल का माझी राणी तू -::
सखे आज झोप काही येत नाहीये
तुझ्याशी गप्पा मारण्याची खूप इच्छा होतेय
काही क्षणांसाठीच पाहिलं मी आज तुला
तुझा चेहरा काही नजरेसमोरून जात नाहीये...
वाटलं एकदा मेसेज करून पहावं तुला
मला आठवत असशील कदाचित तूही असं वाटलं मला
पण पुढच्याच क्षणी आठवलं तो अधिकार अजून मला मिळाला नाहीये
24 तास असशील फक्त माझीच तू योग अजून तो आला नाहीये...
असाच पाहत बसलो फोटो तुझे
त्यातले काही फोटो आहेत फक्त माझे
खूप वाटतं कायमची माझीच बनुन राहावी तू
तुझ्या संगतीने असेन मी राजा जगाचा जेव्हा असशील माझी राणी तू...
Comments
Post a Comment