::- रस्त्यातून दिसणार आयुष्य -::

कधी आपल्याच घराकडे दुरून पाहत थांबतो
दुरून कसं दिसतं असेल माझं घर अंदाज बांधतो
काय वाटतं असेल रस्त्यातून जानाऱ्याला
किती लोक इच्छुक असतील बर माझी जागा घ्यायला?
रस्त्यातून दिसेल एक सरकारी घर
ज्याला सिमेंट च कुंपण अन् पसरलाय सात गुंठ्यावर
कुंपणाच्या आत शेडच्या खाली थांबलेली एक पांढरी शुभ्र कार
मनात येत असेल लोकांच्या किती असेल बर साहेबांचा पगार...
घराबाहेर एक छोटंसं स्वतःच गार्डन
कधी मी झाडांना पाणी घालताना दिसत असणार
साहजिकच मनात येत असेल
मी असतो तर इथे तरकारी उगविली असती यार...
मी तसा नेहमी दाराच्या आतच कोंडलेला असतो
बाहेरून कुठे कोणाला माझा एकलेपणा दिसतो
कधी असच तासभर अंधार करून घडीची टिकटिक ऐकतो
तर कधी बेचैन होऊन घरातच फिरत राहतो...
सगळं असूनही कधी एखाद्या भिखाऱ्यासरख वाटत
जेव्हा दिवस फक्त दाल भात खाऊन निघत
चालूच असतात सारखी फोनवर कॉल्स नी मेसेज
मनातल बोलायला मात्र सोबत कुणीच नसत ...
कधी रमत मन कुणाच्या स्वप्नामध्ये
कधी मन कोणा आपल्यासाठी झुरत
सुखाच्या वस्तूंनी पिंजून ठेवलेलं हे घर
कधी कधी भयाण शांत होऊन जात...
प्रेम करणारा कुणी नाही
ज्याच्यावर प्रेम करावं असाही कुणी सोबत नाही
काळजी करणारा कुणी नाही
ज्याची काळजी करावी असाही कुणी सोबत नाही
घरात वाद करणारा कुणी नाही
ज्याच्याशी वाद करावा असाही कुणी सोबत नाही
चार घास ज्याच्यासोबर प्रेमानी जेविन असा कुणी नाही
ज्याच्यासाठी अजून खूप कमवावं असाही कुणी नाही
जीव ओवाळून टाकेल माझ्यावर असा कुणी नाही
जीव ओवाळून टाकीन मी ज्यावर असाही कुणी सोबत नाही...
आहे काय तर मनात कधी ना थांबणारी हुरहूर
कान घट्ट दाबले तरी ऐकू येणारी एकांताची आवाज
बऱ्याच इच्छा पूर्ण करता येईल एवढा पैसा
आणि कधी ना संपणारा एकटेपणा...

रस्त्यातून हे सगळं दिसत नसेल...

Poem by - Vinod Jadhav

 

Comments

Popular posts from this blog

:: - Of the Skin - ::

TUJHI AATHVAN KHUP YETE

KAS SANGU TULA