::- जा जानू ब्रेकअप -::
जा जानू ब्रेकअप, तुझं प्रेमच नाही माझ्यावर
पण, खरं सांगतो, मी नाही प्रेम केलं फक्त तुझ्या शरीरावर
मनातून तुला माझीच मानतो मी
वेड्यासारखा तुझ्यावर एकतर्फा प्रेम करतो मी ...
शब्दात नाही सांगू शकणार तू काय आहेस माझ्यासाठी
तरी सांगतो देवाने पूर्ण केलेली एक मागणी आहेस तू माझ्यासाठी
असाच नाही तुला भेटण्यासाठी तडफडत मी
असाच नाही रात्रंदिवस तुझे फोटो पाहत मी
कदाचित कधीही माझी होणार नाहीस तू
हे जाणूनही जीवापाड तुझ्यावर प्रेम करतो मी...
का जागाव तुझ्या विचारात रात्रभर
का आठवतो तुझ्या भेटीच्या क्षणांना प्रत्येक श्वासासोबत
का असतो तुझा फोटो सदैव माझ्या डोळ्यासमोर हजर
का लागलेली असते तुझ्या मेसेज कडेच माझी नजर
समजणार नाही तुला पण त्याची मला खंत नाही
तुझ्या प्रेमात पडलो यापेक्षा मोठं सुख मला आठवत नाही ...
कधीतरी अचानक अलगद पोचवेल माझ्या हृदयाची आवाज देव तुला
कधीतरी एकदा मला पाहण्यासाठी होईल बेचैन जीव तुझा
कधीतरी तुही रात्र घालवशील आठवणीत माझ्या
खरं प्रेम झालय ग जानू तुझ्यावर कुठवर राहशील तू माझ्या विना...
असच वाटतं एक दिवस माझा पत्ता शोधत येशील तू
एक दिवस माझा आवाज ऐकल्याशिवाय होशील बेचैन तू
असंच वाटतं एक दिवस प्रेमाची ठिणगी पेटेल हृदयात तुझ्या
आणि सगळं जग सोडून सरळ येशील तू मिठीत माझ्या...
Poem by - Vinod Jadhav

Comments
Post a Comment