::- रात्रीची भेट ती दोन मिनिटाची -::

रात्रीच्या दोन वाजता बिना मेकअपची भेटली मला ती
पाहून ते नितळ सौंदर्य तीच पुन्हा पडलो प्रेमात मी...
एवढं सुंदर कुणी कसं असू शकतं प्रश्न पडलाय मला
आता तुला पुन्हा भेटण्यासाठी जीव माझा उतावळा झाला...
खरंच प्रिये खूप मस्त आहेस ग तू
तुझ्या स्पर्शात आहे एक वेगळीच जादू...
दोन मिनिटांचीच भेट आपली अनोख सुख देऊन गेली
तुला भेटून मनात आलं तू आधी का नाही मला भेटली...
ओढ जीवाला लागली आता दुसऱ्या भेटीची
पहिली परीक्षा सखे आपण पार केली आपुल्या प्रीतीची...
आता दोन मिनिटात मन भरेल असं वाटत नाही
तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यावाचून थांबन आता शक्य नाही...
लवकरच होईल पुढची भेट आपली
भेट ती ठरेल अविस्मरणीय माझ्या आयुष्यातली...
पुढच्या भेटीत रात्रभर तुला मिठीत घेईन
कधी स्वप्नातही विचार न केलेलं तुला सुख देईन...
राणी भीती तू सोडून दे, खुलून प्रेमात मला साथ दे
एका रात्रीतच प्रेमाचा आपल्या आस्वाद घे...
आता तुझ्याहून दूर राहणं मला जमणार नाही
पुढच्या भेटीत कुठलीही शर्त तुझी टिकणार नाही....
खूपच मस्त आहे ग तू राणी तुझ्याहून दूर आता कसं राहू
ये लवकर मिठीत माझ्या चल प्रेमात दोघे वाहून जाऊ...

Poem for- YOU ( जानु ) 

Comments

Popular posts from this blog

:: - Of the Skin - ::

KAS SANGU TULA

TUJHI AATHVAN KHUP YETE