::- नवीन आयुष्य -::

एक काळ होता एकट राहायला भीत होतो मी
आता तिच्या धुंदीत एकटेपणा हवाहवासा वाटतो मला
एक काळ होता गाणी ऐकता ऐकता झोपायचो मी
आता तिचा आवाज सारखा मनात ऐकू येतो मला
एक काळ होता प्रेमाच्या नावाने भिऊ लागलो होतो मी
आता तिच्या प्रेमात पार बुडून गेलोय मी
एक काळ होता जुन्या आठवणी भेडसावत होत्या मला
आता तिच्यासोबत सुंदर वर्तमान दिसतोय मला
एक काळ होता स्वतःला आरशात पाहायचं सोडलं होतं मी
आता तिच्यासाठी व्यवस्थित रहावस वाटतं मला
एक काळ होता एकेक दिवस वर्षासारखा भासायचा
आता तिच्याशी बोलता बोलता कळत नाही दिवस कधी संपला
एक काळ होता नशेत धुंद रहावस वाटायचं मला
आता तिच्या प्रीतीचा नशा चढलाय मला
एक काळ होता हसण विसरून गेलो होतो मी
आता तिला आठवत मनातच हासत राहतो मी
एक काळ होता परत कोणावर जीव लावीन असं वाटलं नव्हतं
आता तिच्यावर जीव ओवाळून टाकावस वाटत मला
एक काळ होता आयुष्य नकोस झालं होत मला
आता आयुष्य माझं सुंदर करण्यासाठी देवाने पाठवलय तुला...

THANK YOU GANPATI BAPPA....

Poem by- Vinod Jadhav

For - YOU ( जानू ) 

Comments

Popular posts from this blog

:: - Of the Skin - ::

KAS SANGU TULA

TUJHI AATHVAN KHUP YETE