::- एक रहस्य तु -::

कवी ओढला जातोय तुझ्यात
अगदी साधीच तर झाली होती आपली सुरुवात
पण तुझ्यात आहे काहीतरी खास
खरं सांगू, अजून समजली नाही कवीला ती बात...

का बरं शेकडोंतुनी तुच असते ध्यानात
का बरं तुझाच आवाज गुंजत राहतो कानात
का बरं तु अलगद झोप मोडून जाते
का बरं स्वप्नातही तुच याविशी वाटते...

का बरं तुला ना पाहता ही तु असल्याचा भास होतो
का बरं तुझाच फोटो कवी न्याहाळून पाहतो
का तु वाटतेस एका रहस्यासारखी
का बरं तुला आठवत राहायला आवडत एकाकी...

एक रहस्य तु समजूनही ना समजलेलं
शब्दांच्या पलीकडे तुझं व्यक्तित्व लपलेलं
कधी वाटत कवीला तुझ अंतरंग समजल
अन् परत बनतेस तु... एक कोड ना सुटलेल...

Poem by- Vinod Jadhav  

Comments

Popular posts from this blog

KAS SANGU TULA

FAKT TUZYA SATHI

TUJHI AATHVAN KHUP YETE