::- तिचा आवाज -::
आवाज नसे जणु तो फक्त ओठातूनी येणारा
मधुर साद असे तो झऱ्यातूनी वाहणारा,
लयबध्द जसा बासुरीचा तो उष्वास
कानात शिरूनी घाली कवीच्या हृदयाशी संवाद...
आवाज नसे जणु तो
ती होती एक अव्यक्त भावना
शब्दापलिकडे ते शब्द तिचे,
हृदयाशी हात घालुनी तिने
जागविली दडलेली सुप्त वासना...
शब्द तिचे ते जादुई मोहिनीचे
ऐकता ध्यान ना उरले वेळ - काळाचे
उगवला सूर्य तसाची मावळला तिच्या चार शब्दाने
अजुनी गुंतूनी कवी तिच्याच आवाजात
हरपले आज देहभान कवीचे....
Poem by- Vinod Jadhav
मधुर साद असे तो झऱ्यातूनी वाहणारा,
लयबध्द जसा बासुरीचा तो उष्वास
कानात शिरूनी घाली कवीच्या हृदयाशी संवाद...
आवाज नसे जणु तो
ती होती एक अव्यक्त भावना
शब्दापलिकडे ते शब्द तिचे,
हृदयाशी हात घालुनी तिने
जागविली दडलेली सुप्त वासना...
शब्द तिचे ते जादुई मोहिनीचे
ऐकता ध्यान ना उरले वेळ - काळाचे
उगवला सूर्य तसाची मावळला तिच्या चार शब्दाने
अजुनी गुंतूनी कवी तिच्याच आवाजात
हरपले आज देहभान कवीचे....
Poem by- Vinod Jadhav
Comments
Post a Comment