::- प्रेमाचा जादू -::

उत्साह माझ्या मनातला कधी मावळतच नाही
वाढतच जातेय रोज चमक माझ्या चेहऱ्यावरची
तुझ्या प्रेमाचा जादू चढलाय माझ्यावर असा काही
चालतो मी जमिनीवर मात्र पाय काही जमिनीला टेकत नाही...
ना उरला आता मोह कशाचा तुझ्या भेटी शिवाय
ना उरली इच्छा मिळवण्याच्यी काही तुझ्या प्रेमा शिवाय
तूच, फक्त तूच हवी आहेस मला
तुझाच, फक्त तुझाच नाव आता आठवत मला
तुझाच, फक्त तुझाच चेहरा आता आवडतो मला
तुझेच, फक्त तुझेच स्वप्न आता येतात मला...
कसली ही जादू सखे केलीस तू माझ्यावर
प्रेमाचा बेधुंद नशा आता चढलाय माझ्या मनावर
मागण एवढच आता मी मागतो देवापुढे
एकही क्षण तुझ्या प्रेमाशिवाय आता जाऊ नये
असच निघून जावं आयुष्य तुझ्यावर प्रेम करता करता
नशा तुझ्या प्रेमाचा कधीच उतरू नये...

Poem by - Vinod Jadhav

Comments

Popular posts from this blog

:: - Of the Skin - ::

KAS SANGU TULA

TUJHI AATHVAN KHUP YETE