::- तुझ्याविना काहीच नाही मी -::

तुझेच फोटो पाहत राहतो मी 24 तास
पण फोटो पाहणं हेच प्रेम दाखवण आहे का ?
तुलाच आठवतो मी २४ तास
पण आठवण करत रहाणं हेच प्रेम आहे का ?
तुझ्या भेटीसाठी असतो आतुर मी 24 तास
पण भेटणं हेच प्रेम असतं का ?
कुठेही असो मी असतो माझ्या मनावर तुझाच ताबा 24 तास
पण कोणाला मनात बसवन हेच प्रेम असतं का ?
जवळ राहावं वाटतं तुझ्या मिठीत घ्यावं वाटतं तुला
दिसताच क्षणी नजरेत काबीज करून ठेवाव वाटतं तुला
दुसरं काही सुचतच नाही फक्त पहातच राहावं वाटतं तुला
तुझ्याविना जगणं हे जगणंच नाही फक्त तूच पाहिजेस मला...
तुझ्या एका आवाजासाठी थांबलोय मी
तुला माझी बनवण्यासाठी तरसलोय मी
फक्त तुझ्या संगे जीवन घालवण्याचे स्वप्न पाहतो मी
तू आहेस तर मी आहे तुझ्याविना काहीच नाही मी...
माझ्यासाठी प्रेम म्हणजे तूच आहेस
माझ्यासाठी आयुष्य म्हणजे तूच आहेस
तूच आहेस माझ्यासाठी आनंदाची परकाष्ठा
तूच आहेस माझ्यासाठी माझी परिभाषा...

Poem by- Vinod Jadhav 
 

Comments

Popular posts from this blog

:: - Of the Skin - ::

KAS SANGU TULA

TUJHI AATHVAN KHUP YETE