::- कुठे गायब झालीस तू? -::

एक Hiyy म्हणून कुठे गायब झालीस तू
एक आस लावून मनाला कुठे लपलीस तू
ह्रदयाचे ठोके वाढवून का शांत झालीस तु
क्षणात माझी अन् पुढच्याच क्षणात कुठे हरवलीस तू...
तुझ्याच विचारांत असतो हरवलेला मी
तुझाच भेटीसाठी आसुसलेला मी
तुझाच जन्मोजन्मीचा एक पागल प्रेमी मी
तू आहेस लैला माझी अन् तुझाच वेडा मजनू मी...
लाखो प्रश्न पडतात मला एक साथ
काही चुकलं तर नव्हत ना माझं जेव्हा झाली तुझ्याशी शेवटी बात
नकळतच व्याकूळ होऊन जात मन माझं
पाहण्यासाठी एकदा चेहरा तुझा, एकदा ऐकण्यासाठी तुझा आवाज...
ऐक ना... तुझा आवाज ऐकल्याविना आता चैन पडणार नाही
तुला मिठीत घेटल्याविना श्वासात श्वास येणार नाही
लवकर ये अलगद आयुष्यात माझ्या अन् बनुन जा माझी राणी
तुझ्याशी दुरावा आता सहन होणार नाही...


Poem by- Vinod Jadhav
 

Comments

Popular posts from this blog

:: - Of the Skin - ::

TUJHI AATHVAN KHUP YETE

KAS SANGU TULA