::- तुझ्यासाठीच आगवपना -::
सगळ्यांसमोर नाही करत मी आगावपणा सगळ्यांसमोर नाही व्यक्त करत मी भावना तेवढं सोपं नसतं मन खोलून बोलणं सर्वांशी कधी कधी रक्ताच्या लोकांशी सुद्धा नाही वाटत आपलेपणा.... काही गोष्टी स्वतःलाही सांगत नाही कधी कधी काही आठवणी कुणाला सांगायची भीती वाटते कधी कधी बरंच काही होऊन जातं आयुष्यामध्ये नकळतच त्यांना विसरून जावस वाटतं कधी कधी.... सर्वांना नाही जमत समोरच्याच मन उघडून घेणं ही तर आहे तुझी जादूगरी बरच तुला सांगितलं जे स्वतःलाही सांगायची भीती होती एवढं सोपं नसतं कुणाशी सत्य बोलून दाखवन.... म्हणून तुझ्या सोबतच करावा वाटतो आगावपणा... तुलाच सांगाव्या वाटतात लपलेल्या भावना... वाटतं कधी भेटून तुझ्या कानामध्ये अजून बरच काही सांगावं... आणि तुझे शब्द ऐकता ऐकता तुझ्या डोळ्यातच हरवून जावं... अजूनही बराच आगावपना सुचतो तुझ्यासोबत तुझ्याच साठी जाग्या होतात काही भावना, शब्दांनी सगळं सांगणं मला जमणार नाही भेट होईल आपली तेव्हाच कळेल तुला... Poem by- Vinod Jadhav