Posts

Showing posts from April, 2025

::- बनशिल का माझी राणी तू -::

सखे आज झोप काही येत नाहीये  तुझ्याशी गप्पा मारण्याची खूप इच्छा होतेय काही क्षणांसाठीच पाहिलं मी आज तुला  तुझा चेहरा काही नजरेसमोरून जात नाहीये... वाटलं एकदा मेसेज करून पहावं तुला  मला आठवत असशील कदाचित तूही असं वाटलं मला पण पुढच्याच क्षणी आठवलं तो अधिकार अजून मला मिळाला नाहीये  24 तास असशील फक्त माझीच तू योग अजून तो आला नाहीये... असाच पाहत बसलो फोटो तुझे  त्यातले काही फोटो आहेत फक्त माझे  खूप वाटतं कायमची माझीच बनुन राहावी तू  तुझ्या संगतीने असेन मी राजा जगाचा जेव्हा असशील माझी राणी तू...

::- सखे तुझे फोटो -::

::- सखे तुझे फोटो -:: साडी असो की इंग्लिश ड्रेस जानू तुझी एक झलक ही करते मला इम्प्रेस छोटीशी बिंदी ती कपाळावरची तुझ्या क्षणात वाढवते माझा हार्ट रेट... काळी साडी ती तुझी अन् ते मोकळे केस त्यावर घातलेला तो नक्षीदार मॅचिंग ब्लाऊज खूपच नितळ ग प्रिये सौंदर्य तुझं कितीदा ही पाहिलं तरी पुरी होतच नाही माझी हौस... सौंदर्य अजून खुलवणार तुझं ते पिवळ इंग्लिश ड्रेस खरं सांगतो सिनेमातून आलेली तू हीरोइन दिसतेस कितीदा पाहिलं फोटो तुझा मी रोखून श्वास इंग्लिश ड्रेस मध्ये जानू तू दिसतेस खूपच खास... आहेत माझ्याकडे डार्लिंग तुझे काही फोटो प्रायव्हेट रोमांचित होऊनी पाहतो मी जेव्हा जेव्हा झोप नाही येत भान हरवून वाटतं माझीच सखी तू जन्मोजन्मीची कधी येईल तो दिवस जेव्हा तुला घेता येईल मिठीत थेट... सर्वच रूप मनमोहक तुझी तू सौंदर्याची खान रोखल किती मनाला पण नकळतच तू बनलिस माझी जान Poem by - Vinod Jadhav  

::- मना सांग मला -::

मना सांग मला, हुरहुर का लागते जीवाला तिच्या भेटीची ओढ का लागते मनाला का तिच्याशीच बोलत रहावसं वाटतं का तिचाच चेहरा नजरेत भरलेलं असत का वाटतं तिची एक झलक तरी रोज दिसावी का वाटतं ती आयुष्यभर सोबत असावी का तिच्या विचारात मन गुंतून असतं का ती आठवताच ओठांवर हसू येत का वाटतं तिला मागच्या जन्मी पासूनच जाणतो मी का वाटतं माझ्या आयुष्यात होती फक्त तिचीच कमी का वाटतं तिच सौंदर्य जगा समोर यावं का वाटतं तिने फुलपाखरासारख स्वच्छंद जगाव का वाटतं जीवनात तिच्या दुःखाचं लवलेश नसावं का वाटत लेकरांसारख तिने हासतच राहावं का कधी वाटतं तिने जादू तर केली नाही माझ्यावर का वाटतं जीवापाड प्रेम कराव तिच्यावर का माझी नसूनही ती माझीच वाटते का ती कधी सोडून जाईल याची भीती वाटते का वाटतं बहाण्याने चिडवाव तिला का वाटतं आपल्या शब्दाने थोड हसवाव तिला का वाटतं तिच्याशी बोलताना कसलाच व्यत्यय नसावं का वाटतं आपल पूर्ण वेळ फक्त तिलाच द्याव का वाटतं दुनियेशी लपून तिच्याशी भेटावं का वाटतं तिला मिठीत घ्यावं आणि वेळ तिथेच थांबावं Poem by - Vinod Jadhav  

::- जा जानू ब्रेकअप -::

जा जानू ब्रेकअप, तुझं प्रेमच नाही माझ्यावर पण, खरं सांगतो, मी नाही प्रेम केलं फक्त तुझ्या शरीरावर मनातून तुला माझीच मानतो मी वेड्यासारखा तुझ्यावर एकतर्फा प्रेम करतो मी ... शब्दात नाही सांगू शकणार तू काय आहेस माझ्यासाठी तरी सांगतो देवाने पूर्ण केलेली एक मागणी आहेस तू माझ्यासाठी असाच नाही तुला भेटण्यासाठी तडफडत मी असाच नाही रात्रंदिवस तुझे फोटो पाहत मी कदाचित कधीही माझी होणार नाहीस तू हे जाणूनही जीवापाड तुझ्यावर प्रेम करतो मी... का जागाव तुझ्या विचारात रात्रभर का आठवतो तुझ्या भेटीच्या क्षणांना प्रत्येक श्वासासोबत का असतो तुझा फोटो सदैव माझ्या डोळ्यासमोर हजर का लागलेली असते तुझ्या मेसेज कडेच माझी नजर समजणार नाही तुला पण त्याची मला खंत नाही तुझ्या प्रेमात पडलो यापेक्षा मोठं सुख मला आठवत नाही ... कधीतरी अचानक अलगद पोचवेल माझ्या हृदयाची आवाज देव तुला कधीतरी एकदा मला पाहण्यासाठी होईल बेचैन जीव तुझा कधीतरी तुही रात्र घालवशील आठवणीत माझ्या खरं प्रेम झालय ग जानू तुझ्यावर कुठवर राहशील तू माझ्या विना... असच वाटतं एक दिवस माझा पत्ता शोधत येशील तू एक दिवस माझा आवाज ऐकल्याशिवाय होशील बेचैन तू असंच वा...

::- रस्त्यातून दिसणार आयुष्य -::

कधी आपल्याच घराकडे दुरून पाहत थांबतो दुरून कसं दिसतं असेल माझं घर अंदाज बांधतो काय वाटतं असेल रस्त्यातून जानाऱ्याला किती लोक इच्छुक असतील बर माझी जागा घ्यायला? रस्त्यातून दिसेल एक सरकारी घर ज्याला सिमेंट च कुंपण अन् पसरलाय सात गुंठ्यावर कुंपणाच्या आत शेडच्या खाली थांबलेली एक पांढरी शुभ्र कार मनात येत असेल लोकांच्या किती असेल बर साहेबांचा पगार... घराबाहेर एक छोटंसं स्वतःच गार्डन कधी मी झाडांना पाणी घालताना दिसत असणार साहजिकच मनात येत असेल मी असतो तर इथे तरकारी उगविली असती यार... मी तसा नेहमी दाराच्या आतच कोंडलेला असतो बाहेरून कुठे कोणाला माझा एकलेपणा दिसतो कधी असच तासभर अंधार करून घडीची टिकटिक ऐकतो तर कधी बेचैन होऊन घरातच फिरत राहतो... सगळं असूनही कधी एखाद्या भिखाऱ्यासरख वाटत जेव्हा दिवस फक्त दाल भात खाऊन निघत चालूच असतात सारखी फोनवर कॉल्स नी मेसेज मनातल बोलायला मात्र सोबत कुणीच नसत ... कधी रमत मन कुणाच्या स्वप्नामध्ये कधी मन कोणा आपल्यासाठी झुरत सुखाच्या वस्तूंनी पिंजून ठेवलेलं हे घर कधी कधी भयाण शांत होऊन जात... प्रेम करणारा कुणी नाही ज्याच्यावर प्रेम करावं असाही कुणी सोबत नाही काळजी ...