::- तु स्वप्नात आली होती -::
साजणी, रात्री तू स्वप्नात आली होती
मनाच्या अंधारातून अलगदच तु
मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवर अवतरली होती.
मायावी तु जादूगर
डोळ्यांच्या आतून डोळ्यांनी बोलत होती;
अशी निशब्द आज आपली भेट झाली होती.
ना स्पर्श वासनेचा ना गंध कुठल्या भीतीचा
ना रोखण्या आली जनता ना बोट कुणी दाविला
ना घाई तुला परतीची ना मी रस्ता तुझा रोखीला;
वेळ काळाचे भान ना उरले
डोळ्यांत तुझ्या पाहता पाहता
जणू वर्षही उलटत गेले.
तशीच हासत, नजरेनी बोलत
हळुच येऊनी पुढ्यात माझ्या तू हात हाती घेतला.
स्पर्श तो जगा वेगळा रोमांचित मन झाले
जागे झाले अंग - अंग, केसालाही शहारे आले.
Poem by- Vinod Jadhav
Comments
Post a Comment