::- आता बरं वाटतंय -::

आयुष्य मनासारखं कुणाच्या चालत नसत
अचानक सगळं कधी संपून जातं,
असाच विचार करत बसतो कधी कधी
सगळं वाईट माझ्यासोबतच का होत...
कधी वाटत चूक तर माझीच होती,
माझ्या आयुष्याच्या मीच आहे गुन्हेगार,
मग दुसर मन म्हणत
जास्त चांगलं असन गुन्हा कधीपासून झालं यार...
बघितलं तर कळलं, हे तर आहे निसर्गाचं चक्र
शून्यातून बनलं होत हे जग म्हणे
चांगल्या सोबत वाईट होन
हे तर ठरलेलंच अस्त...
म्हणुन ठरविलं, आता नमुन नाही राहायचं
चांगलं बनुन रडण्यापेक्षा स्वतःला खुश ठेवायचं
सगळ्यांना खुश करण्यापेक्षा जीवाच्या चार लोकांना जपायचय
आयुष्याच हे सत्य कळल्यानंतर आता बर वाटतंय....
 

Comments

Popular posts from this blog

:: - Of the Skin - ::

KAS SANGU TULA

TUJHI AATHVAN KHUP YETE