::- तिचा आवाज -::
तिचा आवाज.. मंद मधुर नी शांत तो
करुनी सोडी कवीला बेधुंद जो..
आपुलकी तिच्या शब्दा शब्दात बसे
डोळे मिटूनी ऐकता तिचा सहवास भासे
लय तिच्या आवाजात जसी बासुरीची धून असे...
ऐकता ऐकता तिचा आवाज
कानावर होईना माझ्या विश्वास,
ऐकणे कानांनी थांबूनी गेले
शब्द तिचे अलगद मनाला जाऊन भिडले...
संवाद तिचा हृदयाशी सुरू झाला
हळुवार डोळे मी झाकुनी बसलो
हात हाती घेऊनी सोबतीच बसुनी
बोलतेय ती हा भास सुरू झाला...
शब्दात तिच्या जादू भारी
मनावर तिचे ते शब्द कोरले
बोलायचे होते कवीला काही
कविकडे परी आता शब्द ना उरले...
Poem by- Vinod Jadhav
Comments
Post a Comment