::- बेसावध एक सावज तु -::
हरीण तू वाट चुकलेली
मायेच्या या अरण्यात
बेसावध तू तुझ्या शक्तीशी,
दरवळणाऱ्या त्या कस्तुरिशी,
वादळाला लाजवेल अशा तुझ्या गतीशी;
ठाकली जाऊनी बेसावध तू वाघ्राच्या पाशात.
वाघ जाणतो तुझी गती,
तुझ्या काटेरी शिंगाची त्यालाही भीती,
म्हणुनी तुजला एकटी गाठण्या
बसला तो घात घालुनी झुडपाच्या पाठी;
वादळाला हरवणारी येणार कशी तू त्याच्या हाती.
वाघ जाणतो तुझी कमी,
हृदयाची हळवी तू,
तुझ्याच शक्तीशी बेसावध सावज तू,
तुज भीती त्याच्या पंजाची
भुलूनी सामर्थ्य स्वतःच
धावशिल तू एका ललकरिशी.
एकदा लडूनी तर बघ सावजा
चव तुझ्या शिंगाची वाघाला चाखुदे एकदा,
थांब एकदा अडीग होऊनी
हे अरण्य तुझं हे रानही तुझं,
बघ रोखुनी वाघाच्या नजरेत
सांग डोळ्यांनी तू नाही फसणार
आज त्याच्या पाशात.
असला वाघ जरी,
वणरानी तुझ्यात अपार शक्ति;
निडर नजरेनी वार करुनी
सांग तयाला तु नाही पळून जाणारी
जाणुनी शक्ति तुझी
तुलाही दिसेल त्याच्या ह्रुदयात तुझी भीती.
Poem by- Vinod Jadhav
Comments
Post a Comment