::- तुझ्याच मॅसेज ची वाट बघतोय -::
एकदाही फोन डिस्चार्ज होऊ दिला नाही,
डोळ्यासमोरुन फोन दूर जाऊ दिला नाही,
' नेट तर चालू आहे ना ? ' सारखी खात्री करतोय,
तुझ्याच मॅसेज ची वाट बघतोय ....
सोबतचे सगळे जेवायला गेले
काही जण बाहेर फिरूनही आले
मी मात्र फोन चेक करत बसलोय
तुझ्याच मॅसेज ची वाट बघतोय....
काही करायचं मन होत नाहीये
आज तर भूक पण लागत नाहीये
लवेरिया ची लक्षण नेट वर पाहतोय
तुझ्याच मॅसेज ची वाट बघतोय.....
Poem by- Vinod Jadhav
Comments
Post a Comment