::- तुझी तारीफ करू का? -::
एक स्वप्नपरी तु सुंदर चंचल
नयन कटारी करिती जीव घायल.
मोहक तू सोनाली जैसी
नजरेनी तुझ्या कवी होईल पागल.
तुज नाही कळाले अजुनी
तू सौंदर्याची खान सजनी,
नासमज तू हिरणी जैसि असशी
तूच कस्तुरी गुपित हे तुज उमगले ना अजुनी.
सुंदर रूप तुझं तू सौंदर्याची धरती
चमक चांदण्याची तुझ्या ओठावर्ती
लक्ष तारे तुझ्या डोळ्यांत बसती
केसांत तुझ्या वादळ स्वेर फिरती
मनी माझ्या अजुनी तारीफ
तुझ्या रुपाची खूप करावी
कधी वाटत जगाहूनी सुंदर तू
तू स्वर्गातूनी आलेली अप्सरा असावी
Poem by-- Vinod Jadhav
Comments
Post a Comment