Posts

Featured post

::- तुझ्यासाठीच आगवपना -::

सगळ्यांसमोर नाही करत मी आगावपणा सगळ्यांसमोर नाही व्यक्त करत मी भावना तेवढं सोपं नसतं मन खोलून बोलणं सर्वांशी कधी कधी रक्ताच्या लोकांशी सुद्धा नाही वाटत आपलेपणा.... काही गोष्टी स्वतःलाही सांगत नाही कधी कधी काही आठवणी कुणाला सांगायची भीती वाटते कधी कधी बरंच काही होऊन जातं आयुष्यामध्ये नकळतच त्यांना विसरून जावस वाटतं कधी कधी.... सर्वांना नाही जमत समोरच्याच मन उघडून घेणं ही तर आहे तुझी जादूगरी बरच तुला सांगितलं जे स्वतःलाही सांगायची भीती होती एवढं सोपं नसतं कुणाशी सत्य बोलून दाखवन.... म्हणून तुझ्या सोबतच करावा वाटतो आगावपणा... तुलाच सांगाव्या वाटतात लपलेल्या भावना... वाटतं कधी भेटून तुझ्या कानामध्ये अजून बरच काही सांगावं... आणि तुझे शब्द ऐकता ऐकता तुझ्या डोळ्यातच हरवून जावं... अजूनही बराच आगावपना सुचतो तुझ्यासोबत तुझ्याच साठी जाग्या होतात काही भावना, शब्दांनी सगळं सांगणं मला जमणार नाही भेट होईल आपली तेव्हाच कळेल तुला... Poem by- Vinod Jadhav  

::- तुझ्याविना दिवस कसा गेला -::

कस सांगु, तुझ्याविना माझा दिवस कसा गेला एक एक क्षण आज जड भासत होता मला... खूप उत्साहात आजचा हा दिवस उजाडला होता तुझा आवाज कानी पडेल आज तुझा चेहरा दिसेल आज मला विश्वास वाटला होता... सकाळ तशीच निघून गेली... उगाच मनाला वाटल तु माझी आठवण केली पण आपल्या बोलण्याची आजुन वेळ नव्हती झाली... सूर्य चडला डोक्यावरती जसा उन्माद मनात तसा वाढत होता कधीही वाजेल फोनची घंटा म्हणुन मी फोन नजरे समोरच ठेवला होता... दुपार सरली रात्र आली तु काही फोन केला नाही तुझ्या आठवणीत आज माझ्याने एक घासही गेला नाही... अशी अवस्था करशील तु अस वाटल नव्हत आधी, तु तर आहेच मोहिनी स्वप्नपरी गुंतला कवी तुझ्या आठवणीत यात तुझा काही दोश नाही.. माझीच कीव येते मला आठवणीत तुझ्या मला अजुन तडपायच नाही म्हणुन जा आज मीच तुझ्याशी बोलणार नाही... Poem by- Vinod Jadhav  

::- तिचा आवाज -::

आवाज नसे जणु तो फक्त ओठातूनी येणारा मधुर साद असे तो झऱ्यातूनी वाहणारा, लयबध्द जसा बासुरीचा तो उष्वास कानात शिरूनी घाली कवीच्या हृदयाशी संवाद... आवाज नसे जणु तो ती होती एक अव्यक्त भावना शब्दापलिकडे ते शब्द तिचे, हृदयाशी हात घालुनी तिने जागविली दडलेली सुप्त वासना... शब्द तिचे ते जादुई मोहिनीचे ऐकता ध्यान ना उरले वेळ - काळाचे उगवला सूर्य तसाची मावळला तिच्या चार शब्दाने अजुनी गुंतूनी कवी तिच्याच आवाजात हरपले आज देहभान कवीचे.... Poem by- Vinod Jadhav 

::- मनात तुझ्या चाललय काय? -::

गोडी लागली मला तुझ्या शब्दांची नशा चढतो मला तूझ्या आवाजानी तु आठवण करते मैलो दूर माझी चाहूल लागते इथे कवीला तुझ्या हृदयाची... सखे मनात तुझ्या चाललय काय? बोलायच असत खूप तुला मीही आसुसलेला असतो इथे तुझा आवाज ऐकायला बोलायचं थांबतेस... परत बोलतेस... दहादा म्हणतेस बाय - बाय. राणी मनात तुझ्या चाललय काय? चोरुन जगाशी बोलतेस फक्त माझ्याशी मीही असतो तुझ्या शब्दांचा उपाशी खर सांग, माझ्यावर तु जादू केलीस काय.. प्रिये मनात तुझ्या चाललय काय? हजारदा ऐकले मी प्रेमाचे गीत तु पाठविलेले माझ्या जीवनातल संगीत बनायला तुला आवडेल काय? सांग, मला तुझं ऐकायची इच्छा आहे. Poem by- Vinod Jadhav  

::- एक कठीण कोड तु -::

रोजच काही क्षण आनंदाचे जीवनात येतात रोजच काही क्षण हृदयाचे ठोके वाढतात रोजच काही क्षण मला बेभान करून जातात जेव्हा तुझे स्वप्न माझ्या डोळ्यांत असतात... रोजच हसतो कधी कधी काही कारण नसताना वेळ सरतो भरकन तु संपर्कात असताना, भुरळ पाडून मला तु जातेस रंगून तुझ्या जगात डोळे मात्र कवीची तुझ्याच स्वप्नात रमतात... रोजच होते अस काही जे पूर्वी कधी झाल नव्हत बोलतो शेकडो लोकांशी पण व्यसन कुणाच लागल नव्हत... आहे तुझ्यात काही खास .. जी ओढते मला तुझ्यात एक कठीण कोड तु... तुला समजलो मी हे फक्त एक भासच होत... Poem by- Vinod Jadhav  

::- एक रहस्य तु -::

कवी ओढला जातोय तुझ्यात अगदी साधीच तर झाली होती आपली सुरुवात पण तुझ्यात आहे काहीतरी खास खरं सांगू, अजून समजली नाही कवीला ती बात... का बरं शेकडोंतुनी तुच असते ध्यानात का बरं तुझाच आवाज गुंजत राहतो कानात का बरं तु अलगद झोप मोडून जाते का बरं स्वप्नातही तुच याविशी वाटते... का बरं तुला ना पाहता ही तु असल्याचा भास होतो का बरं तुझाच फोटो कवी न्याहाळून पाहतो का तु वाटतेस एका रहस्यासारखी का बरं तुला आठवत राहायला आवडत एकाकी... एक रहस्य तु समजूनही ना समजलेलं शब्दांच्या पलीकडे तुझं व्यक्तित्व लपलेलं कधी वाटत कवीला तुझ अंतरंग समजल अन् परत बनतेस तु... एक कोड ना सुटलेल... Poem by- Vinod Jadhav  

::- तुझ्यात काही खास आहे -::

तुझ्याशीच बोलावस का वाटत...? का तुझाच आवाज ऐकावस वाटत..? तुझ्या शब्दांनी मन शांत का होत...? का तुझाच विचार मनात येत राहत..? काय आहे तुझ्यात जे कुनामधी दिसलं नाही.. फक्त एक तुच तर स्वप्नाहूनी सुंदर नाही.. पाहिले हजारो हसरे चेहरे मन कधी कुणावर रुळल नाही... कशी करतेस शब्दांनी जादुगरी तु सहजच मनाची तार जुळली बोलणं तुझ्याशी असत काहीच क्षणांच आवाज तुझा कानातून निघत नाही... कशी केलीस ही किमया तु कस मला तू काबीज केलीस असाच कसा मी तुझ्यात गुंतलो मला मोहित करणे सोप नाही Poem by-Vinod Jadhav