::- हुरहूर -::
खूप तडफतोय मी तुझा आवाज ऐकायला
खूप आवडतं मला तुझ्याशी बोलायला...
रात्री झोप काही केल्या नाही, कट्टी झालीय माझी झोपशी
वाट बघत असतो मी तुझ्या कॉल नाहीतर मेसेजची...
डोळे बंद केले की सारखी तूच असते समोर
झोपाव म्हटलं तर मनात सुरू होते हुरहूर...
खूप पारेशान झालोय ग राणी तुझ्या नादात
काहीतरी जादू आहे तुझ्या आवाजात...
पहील्या सारखं मोबाईल पाहत बसू वाटत नाही
आता तुझा फोटो हजारदा पाहिल्याशिवाय चैनच पडत नाही...
कधी येईल तुझा मेसेज मी वाट पाहत बसतो
फोन सायलेंट तर नाही ना? मी शंभरदा तपासतो...
काय काय बोलायच तुझ्याशी सारखा हाच विचार चालू असतो
फोन वाजताच मी ताडकन उठून बसतो...
पण तू काही फोन करतं नाहीस
सांग मी काय करू, काय हालत माझी केलीस तु
सारखा देवाला कोसत बसतो मी, आधी का नाही भेटलीस तू...
Poem by- Vinod Jadhav
Comments
Post a Comment