::- तुझ्याशी बोलत राहीन -::

तुझ्याशी तोवर बोलत राहीन
जोवर तू म्हणणार नाहीस
' तू परेशान करतोय मला '...
तुझ्याशी तोवर प्रेम करीन
जोवर तू म्हणणार नाहीस
' एवढं प्रेम नको मला '....
तुझी एवढी काळजी घेईन
जोवर तू म्हणणार नाहीस
' जा तुझी गरज नाही मला '...
तुझी एवढी आठवण करत राहील
जोवर तू म्हणणार नाहीस
' नको करुस आठवण माझी, दिवसभर उचकी येते मला '...
प्रेमात पडलोय ग राणी मी तुझ्या
प्रेमात एवढं बुडविन तुला की म्हणशील
' सात जन्मासाठी तूच प्रियकर पाहिजे मला '....

Poem by- Vinod Jadhav  

Comments

Popular posts from this blog

:: - Of the Skin - ::

TUJHI AATHVAN KHUP YETE

KAS SANGU TULA