::- प्रेमाबद्दल जास्त समजत नाही मला -::
मला प्रेमाबद्दल जास्त समजत नाही... पण माझ्यासाठी जे काय आहेस ते तूच आहेस... फक्त तूच आहेस... माझ्या आयुष्याची व्याख्या तूच आहेस... माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर आठवण तूच आहेस... तूच आहेस माझ्यासाठी जगण्यातला जिवंतपणा... तूच आहेस माझ्यासाठी माझ्या भविष्याची कल्पना.... स्वप्न असतात काय हे तुझे स्वप्न पाहता पाहताच शिकलो मी... कुणाच्या आठवणीत आकंठ बुडणे काय असतं हे तुझ्या आठवणीतूनच शिकलो मी.... तुझ्यापासूनच शिकलो मी पुन्हा एकदा आयुष्य जगायला... तुझ्यापासूनच शिकलो मी जगण्यासाठी लढायला.... तुला नाही माहित तू काय आहेस माझ्यासाठी... तुला नाही माहित श्वासाचं महत्त्व काय असतं जगण्यासाठी.... तू म्हणजे माझ्यासाठी श्वासच माझा.... तू म्हणजे रोज जगाला सामोरे जाण्यासाठीचा आत्मविश्वास माझा.... Poem by- Vinod Jadhav