तू आहेस की नाही
डार्लिंग तू अशी मला एकट सोडून गेलीस
मी मुद्दामहूनच रोज पिऊन येतो मला वाटतं तू रागावशील
पण तू रागवत नाहीस
मी घर असंच अस्ताव्यस्त ठेवत असतो
पण तू काहीच बोलत नाहीस
कधी विचार करतो तू समोरून काहीतरी बोलशील
पण रात्र अशीच संपते तू काहीच बोलत नाहीस
मला आजही वाटतं तुझं वास्तव्य या घरातच आहे कुठेतरी
पण तुझ्या हसण्याची चिन्ह मात्र कुठेच दिसत नाहीत
मी असाच बिघडत राहणार
रोज दारू पिऊन घरात येणार
घर असाच घाण अस्ताव्यस्त ठेवणार
एक ना एक दिवस तू रागावशील तू बोलशील
"काय चाललंय हे".
मला तुझ्याकडून हेच ऐकायचय.
Comments
Post a Comment