::- मला कधीच बाय म्हणू नकोस -::

मला कधीच बाय म्हणू नकोस...
असच राहू देत जा अधुर बोलणं आपलं
असच चालू राहू देत गप्पा आपल्या
निरंतर कधी ना संपणाऱ्या...
मध्येच व्यस्त हो कामात आपल्या
मी वाट पाहीन
मध्येच जग सुखाने आयुष्य आपलं
मी वाट पाहीन
खूप हास खूप आनंद उधळ जगात तू
मी वाट पाहीन
नवनवीन आनंद घे या जीवनाचे तू
मी वाट पाहीन
जगता जगता कधी हसता हसता येईल तुला आठवण माझी
मी वाट पाहीन...
परत रंगवू गप्पा आपल्या जस कधी आपण थांबलोच नाही
परत हरवून जाईन मी शब्दांत तुझ्या
जसा क्षणाचाही दुरावा कधी आलाच नाही...
तुझी वाट पाहण्यात आहे एक वेगळीच नशा
तुझ्या विचारांत हरविनात्यातच मिळते मला जगण्याची मजा
तुझ्या स्वप्नांतच दिसते मला आयुष्याची दिशा...
पण, तू कधीच मला बाय म्हणू नकोस

Poem by- Vinod Jadhav  

Comments